उद्देश(स्वच्छता)

वैयक्तिक शौचालय सुविधा व वापर : ग्रामपंचायत अंतर्गत गावात एकुण २४८ कुटुंब असून प्रत्येक कुटुंचाकडे शौचालय सुविधा आहे. तसेच ग्रा.पं. अंतर्गत शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र, ग्रा.पं. कार्यालय व ईतर शासकीय कार्यालय यांचेकडे शौचालय उपलब्ध असुन हात धुण्यासाटी पाण्याची व्यवस्था आहे. संपूर्ण गावकरी शौचालयाचा वापर करतात. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतापासुन घरगुती व शासकिय कार्यालयातील शौचालय योग्य अंतरावर आणि तांत्रीक दृष्ट्या व पर्यावरण दृष्ट्या योग्य आहे. मागील ५ वर्षात लाल पिवळे कार्ड मिळालेले नाही. टिसीएल सैम्पल तपासणी करिता प्रादेशिक प्रयोग शाळा वर्धा येथे पाठविण्यात येते. मागील ४ वर्षापासून जाम (पुन.) येथे कोणताही जलजन्य आजार आढळून आलेला नाही. वेळोवेळी पिण्याच्या पाण्याच्या खोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करूण आवळलेल्या त्रुटींची पुर्तता केली जाते व ग्रा.पं. च्या पाणी पुरवठ्यासंबंधीत नोंदवह्या अद्यावत केल्या जातात.
सांडपपाणी व्यवस्थापन : संपूर्ण गावात नाल्यांची व्यवस्था असून पाणी उताराचे दिशेने गावाबाहेर असलेल्या मोठ्या नाल्यात सोडल्या जाते. गावात प्रत्येक घरी परसबाग असुन पाण्याचा पुर्नवापर परसबागेत केला जातो. कुठेही सांडपाणी रस्त्यावर आलेले दिसत नाही अथवा दुर्गंध येत नाही. नाली व्यवस्थापन/ सांडपाणी व्यवस्थापन व्यवस्थितरित्या केलेले आहे.
घनकचरा व्यवस्थापन : गावात घरोघरी कचराकुंड्या असुन सार्वजनीक ठिकाणी सुद्धा कचराकुंड्या आहेत व त्यांचा नियमीत वापर केल्या जात आहे. ग्रामपंचायत द्वारा आठवड्यातून दोनदा सदर कचरा घंटागाडीद्वारे गोळा केल्या जातो.

ग्रामपंचायत योजना

पायाभूत सुविधाः ग्रामीण रस्त्यांसाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMJSY) शेतातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना (महाराष्ट्र).
ऑनलाइन सेवांसाठी (कर,प्रमाणपत्रे) महा ईग्राम (महाराष्ट्र), नियोजन आणि पारदर्शकतेसाठी ईग्रामस्वराज.
ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रॉपर्टी कार्ड जारी करण्यासाठी स्वामित्व योजना.
राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत कार्यक्रम, स्थानिक पर्यटन विकास, ग्रामीण ऊर्जा.
राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान, सहभागी नियोजनासाठी लोक योजना अभियान (सबकी योजना, सबका विकास).
प्रमाणपत्रे: जन्म, मृत्यू, विवाह, दारिद्र रेषेखालील असल्याचा दाखला, ग्रामपंचायत येणे बाकी नसल्याचा दाखला, नमुना ८ उतारा व निशुल्क असल्याचा दाखला आणि मान्यताप्राप्त इत्यादी बहुउद्देशीय आपले सरकार सेवा केंद्र किंवा महा ई-ग्राम पोर्टलद्वारे.
प्रधानमंत्री मुद्रा योजना
बांधकाम कामगार योजना
प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्र
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/ वैयक्तिक घरकुल योजना
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (MREGS)